गाव नमुना 8-अ म्हणजे काय? | 8-अ उताऱ्याची सविस्तर माहिती
🔷 गाव नमुना 8-अ म्हणजे काय? गाव नमुना 8-अ हा महसूल विभागाचा महत्त्वाचा अधिकृत नोंदवही (Village Form) आहे.हा नमुना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या दफ्ताराचा भाग आहे या उताऱ्यामध्ये गावातील जमिनींची एकत्रित माहिती नोंदवलेली असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर – 👉 गावातील सर्व खातेदारांची आणि त्यांच्या जमिनींची एकूण स्थिती दाखवणारा उतारा म्हणजे गाव नमुना 8-अ. 🔷 गाव नमुना 8-अ मध्ये कोणती माहिती असते? गाव नमुना 8-अ मध्ये खालील माहिती नमूद असते 👇 खातेदाराचे नाव खाते क्रमांक जमीन क्षेत्रफळ (हे.आर.) जमिनीचा प्रकार (जिरायत / बागायत) आकारणी (Assessment) जमीन महसूल शेतीसंबंधित इतर तपशील 👉 7/12 उतारा हा वैयक्तिक जमिनीचा असतो, तर 8-अ हा खातेदारनिहाय एकत्रित उतारा असतो. (गाव नमुना 8-अ (Village Form 8-अ) – जमिनीची एकत्रित माहिती दर्शविणारा महसूल उतारा) 🔷 7/12 आणि 8-अ मधील फरक मुद्दा 7/12 8अ स्वरूप ...