श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती
(महाराष्ट्र शासनाची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गरजू जेष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते. 🟥 योजनेचा उद्गदेश : गरीब, निराधार व उत्पन्नाचा आधार नसलेल्या जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे व त्यांचे जीवनमान सुधारण्याचा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. 🟥पात्र कोण? 👇 गट (अ) : -65 ते 79 वयोगटातील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.1300/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु200./- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.1300/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/...